जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक. #Arrested


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
भामरागड:- भामरागड तालुक्यात असलेल्या पोलीस मदत केंद्र कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्यांच्या जनमिलीशीया सदस्याला गडचिरोली पोलीस जवानांनी नक्षल बॅनर लावतांना रंगेहात अटक केली आहे. सदर जनमिलीशीया सदस्य पोलीस मदत केंद्र कोठी अंतर्गत असलेल्या तुमरकोडी या गावातील रहीवासी असुन त्याचे नाव लालसु चैतु मट्टामी असे आहे.

दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी नक्षलवाद्यांचा विलय दिन असुन त्या पार्श्वभुमीवर नक्षलवादी जिल्हयातील विविध भागात हिंसक कारवाया करीत आहेत. अतिदुर्गम गावामध्ये नक्षलवाद्यांचे स्थानिक संघटन जनमिलीशीया कार्यरत असुन अटक करण्यात आलेला लालसु चैतु मट्टामी हा जनमिलीशीया सदस्य आहे.
गडचिरोली पोलीस दलाकडुन सदैव नक्षलवाद्यांना मदत न करण्याच्या वारंवार सुचना देवूनही सदर सद्ष्य पोलीसांचे सांगणे ऐकुन न घेता नक्षलवाद्यांना मदत करीत होता. आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी कोठी जंगल परीसरात नक्षलवाद्याच्या विलय दिनाच्या निमीत्याने सामान्य जनतेमध्ये दहशत परविण्यासाठी नक्षल बॅनर लावत असतांना आढळुन आला. त्याचे कडुन नक्षल बॅनर व इतर नक्षल साहीत्य हस्तगत करण्यात आले असुन गडचिरोली पोलीस दला कडुन त्याच्यावर अटकेची कार्यवाही सुरु आहे.
नक्षलवाद्यांच्या २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, मनीष कलवानिया , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, पोलीस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले (अभियान), सी-60 चे प्रभारी अधिकारी सपोनि. अभिजीत पाटील यांचे नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात नक्षविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असुन सदरच्या कारवाई करीता भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवने व पोमके कोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि महेश घुगे यांनी अथक परीश्रम घेतले आहे.
जनमिलीशीया सदस्याला रंगेहात पकडणाऱ्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे. यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नक्षलवाद्यांच्या विलय दिन सप्ताहाला कोणतेही सहकार्य न करता जोरदार निषेध करावा असे जनतेला आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत