जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चकमकीत नक्षल्यांचे शिबीर उद्ध्वस्त. #Police

घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- नक्षलवाद्यांकडून विलय दिनाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला.भामरागड तालुक्यातील जंगलात रविवारी झालेल्या चकमकीत नक्षलींचे शिबीर उद्ध्वस्त झाले.
यात कोणी जखमी झाले नसले तरी त्यानंतर राबविलेल्या शोधमोहीमेत घातपातासाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले.
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ताडगाव हद्दीतील मौजा मडवेली जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचेे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्याांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांचा वाढता दबाव पाहुन नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलात पळ काढला.
२१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विलय दिनाच्या पार्श्वभुमीवर पेरमिली दलमच्या नक्षलवाद्यांनी आयईडी व कुकर बॉम्ब लावून मोठी घातपाताची योजना आखली होती. जवानांच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कुटील डाव उधळून लावण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले.
आयईडी, कुकर बॉम्ब केले नष्ट.....

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले. त्यात घटनास्थळाच्या निरीक्षणावरून अंदाजे 35 ते 40 नक्षलवादी शिबीर लावून होते असे दिसून आले. घटनास्थळावरून आयईडी, कुकर बॉम्ब, पिट्टू बॅग व नक्षल साहित्य हस्तगत करण्यात आले. आयईडी व कुकर बॉम्ब जागेवरच नष्ट करण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक अहेरी (अभियान) मनिष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), सी-60 प्रभारी अभिजीत पाटील यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. विशेष अभियान पथकाच्या या कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक करत नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे निर्देश दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत