Top News

बांबूची लागवड करुन आर्थिकोन्नती साधणे शक्य:- आ. कृष्णा गजबे. #Bamboo

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
देसाईगंज:- येथील वनविभाग वडसा व महाराष्ट्र बांबु विकास मंडळ नागपूच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक बांबुचे उत्पन्न घेतल्या जात असुन या माध्यमातून येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यात मोठी भूमिका बजाऊ शकते.
बांबुची मोठ्या प्रमाणात लागवड करुन त्याचे संरक्षण व संवर्धन केल्यास आर्थिकोन्नती साधणे शक्य असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांनी केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर, गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबु प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी, देसाईगंज नगर परिषदेचे नगराध्यक्ष शालु दंडवते, वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक मनोज चव्हाण आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार गजबे म्हणाले की बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तुंना जगात मोठी मागणी असल्याने या माध्यमातून देशाच्या अर्थकारणास मोठी चालना मिळु शकते. गडचिरोली जिल्ह्यात बांबुचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असुन शेतक-यांना अर्थकारणासाठी हा उत्तम पर्याय ठरु शकते. यामुळे बांबूची जास्तीत जास्त लागवड करुन आर्थिक स्थितीत अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केला. जगात बांबुच्या दीड हजार प्रजाती असुन यापैकी 100 हून अधिक प्रजाती गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. तसेच बांबुची वाहतूक व विक्री करण्याच्या अटीत शिथीलता देण्यात आल्याने शासनाच्या अटल बांबु समृद्धी योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घेऊन बांबुची लागवड करावे, असे डाॅ.नामदेव उसेंडी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डाॅ. मानकर यांनी म्हटले की बांबुची हिरवे सोने म्हणून ओळख असुन बांबुला लाकडासाठी पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. यापासून मिळणा-या वंशलोचनाचे आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व असल्याने बांबुची जास्तीत जास्त लागवड करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या वेळी वनरक्षक जि.पी धारणे, सामान्य सुविधा केंन्द्र वडसाचे व्यवस्थापक कांतिलाल गजभिये, वन परिक्षेत्राधिकारी धांडे व परिसरातील बुरड बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने