जाहिरात... Advertisement... विज्ञापन

जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योती वाकडे यांच्या हस्ते माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चष्मे वाटप. #Warora

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
वरोरा:- जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योती वाकडे यांच्या हस्ते माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चष्मे वाटप करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या विद्यमाने दिनांक 20/0 9/2021 रोजी सोमवारला माढेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत नेत्र तपासणी आणि चष्मा वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या शिबिराचे उद्घाटन व रुग्णांना चष्मे वाटप जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योती वाकडे तथा प्राथमिक आरोग्य केंद्र माढेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सौ. रोहिणी देवतळे माजी सभापती पंचायत समिती वरोरा, सौ. सुनंदा जिवतोडे जिल्हा परिषद सदस्य, देवानंद महाजन सरपंच माढेळी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर चिकटे मॅडम, कर्मचारी स्टॉप व माढेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत