(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील सिर्सी येथील किसन गेडाम यांच्या घरांचे काल अति मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे. यांची माहिती साखरी ग्रामपंचायत सरपंच ईश्वर गेडाम यांना माहीत दिली असता. किसन गेडाम यांच्या घरी भेट दिली व पाहणी करून त्याची दखल घेत त्वरित तलाठी यांना प्राचारण करून घराचा पंचनामा करण्यात आला.
घराची भरपाई लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच ईश्वर गेडाम यांनी केली आहे त्यावेळी उपस्थित सरपंच ईश्वर गेडाम.उपसरपंच दादाजी किनेकार . अविनाश निकूरे तलाठी साहेब.किसन गेडाम सह आदी उपस्थित होते.