जाहिरात... Advertisement... विज्ञापन

ऑल इंडिया पँथर सेनेची जिल्हा संघठन बैठक संपन्न. #Meeting

जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके तर जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर यांची नियुक्ती.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वीरेंद्र मेश्राम, सिंदेवाही
चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील यंत्रणा वाढते अत्याचार रोखण्यास कुचकामी ठरत आहे. विकृत मानसीकतेच्या माध्यमातून बौद्ध, आदिवासी, बहुजनातील सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबून त्यांच्यावर हल्ले घडवून आणण्याचा कट येथील मनुवादी विचारांच्या लोकांकडून होत आहे. या विकृत मानसिकते विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दिपकभाई केदार सातत्याने संघर्ष करीत आहेत.


संघर्षनायक दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे व सुरेश नारनवरे सह सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठा झंझावात सुरु झाला आहे. दिनांक १९.०९.२०२१ ला डिआरसी हेल्थ क्लब बुद्धविहार बंगाली कँप येथे नुकतीच जिल्हा संगठन बैठक पार पडली. या बैठकीत ऑल इंडिया पँथर सेना संगठन वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण करण्याकरिता पँथर चे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून अजय झलके यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यागीभाई उर्फ प्रविण देठेकर यांची नियुक्ती करण्यात आली.


ऑल इंडिया पँथर सेना संगठन बैठकीचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष डांगे, सुरेश नारनवरे, भैय्याजी मानकर, मिलिंद दुधे, वनकर साहेब, निशाल मेश्राम, पपीता जुनघरे, सारिका उराडे, रेखा गेडाम, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना पँथर चे जिल्हा मार्गदर्शक म्हणून सुरेश नारनवरे यांनी आपल्या मार्गदर्शनात या जिल्ह्यात युवकांनी मोठ्या प्रमाणावर पँथर मध्ये सामिल व्हावे व अन्याय, अत्याचारा विरोधात जशास तसे बंड करावे असे आवाहन केले. तर सल्लागार म्हणून संतोष डांगे यांनी या कुचकामी व्यवस्थेविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली आहे. असे म्हणत या महाराष्ट्रातील विकृत व्यवस्थेविरोधात तोफ डागली.
पँथर चे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना या जिल्हात जिथे जिथे अन्याय अत्याचार घडणार तिथे तिथे पँथर चा आवाज बुलंद होईल.या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटन उभं करण्यास त्या तालुक्यात बैठकीचे आयोजन केले जात आहे. पँथर चा नारा घराघरातून मि पँथर बोलतोय आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी निर्माण केली जात आहे. भविष्यात अन्याय, अत्याचार विरोधात पँथर बुलंद आवाज करणार अशा विविध विषयांवर कणखर मत मांडले.
नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बैठकीला मोठ्या संख्येने महिलांची व युवकांची आणि नागरिकांची उपस्थिती राहून नागरिकांनी उत्सुकता दर्शवली.#Meeting

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत