एकात्म मानववादाचे प्रणेते म्हणून पंडितजींचा उल्लेख - भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
घुग्घुस:- शनिवार 25 सप्टेंबर रोजी सकाळी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात एकात्म मनाववादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व विचारवंत पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या आज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.#Adharnewsnetwork
याप्रसंगी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेसमोर पुष्प व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले एकात्म व मानववादाचे प्रणेते म्हणून पं. दीनदयाल उपाध्यायजींचा उल्लेख केला जातो अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास करणे हा अंत्योदयचा नारा त्यांनी दिला त्यांच्या शिकवणीनुसार भाजपा कार्य करते भाजपा तर्फे वर्षामध्ये बूथवर जे सहा कार्यक्रम राबविले जातात त्या पैकी हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, विनोद चौधरी, शाम आगदारी, अनंता बहादे, भारत साळवे, साजन गोहने, वैशाली ढवस, सुचिता लुटे, प्रवीण सोदारी, विनोद जंजर्ला, राजेंद्र लुटे, जयवंती कैथवास, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पायल मांदाडे, अजय लेंडे उपस्थित होते.#BJP