🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भाजपा तालुका पोंभुर्णा येथे पंडित दीनदयाळ यांच्या जयंती निमित्त अभिवादन व सेवा सप्ताह. #Pombhurna

भाजपा तर्फे अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप व 10 वी पर्यंत शालेय दत्तक.

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभुर्णा:- एकात्म मानवतावादाचे प्रणेते आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा कार्यालय येथे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तसेच पंडित दीनदयाळ यांच्या जयंती व पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने भारतीय जनता पार्टी ता. पोंभुर्णा च्या माध्यमातून तालुक्यात सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम व भाजपा महिला आघाडी यांचे कडून तालुक्यातील आई वडील नसलेल्या (अनाथ) मुलांना स्कूल बॅग, टिफिन बॉक्स, कंपासपेटी, नोट बुक्स, पेन भेट देण्यात आले. तसेच या मुलांचा वर्ग 10 वी पर्यंत लागणारा शालेय खर्च अल्का आत्राम व भाजपा महिला आघाडी यांच्या मार्फत करण्यात येणार आहे असे त्यांनी प्रसंगी सांगितले.
याप्रसंगी देवराव भोंगळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रपूर, कु अल्काताई आत्राम सभापती प स पोंभुर्णा तथा जिल्हाध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर , मा विनोदभाऊ देशमुख प. स सदस्य , गंगाधर मडावी प. स सदस्य , ईश्वर नैताम ता महामंत्री भाजपा , हरीश ढवस ता महामंत्री भाजपा , नंदकिशोर तुमुलवार भाजपा नेते ,अजय मस्के ता अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा , गजानन मुदपुवार शहर महामंत्री ,सुनीता म्यॅकळवार माजी नगरसेविका , रजिया कुरेशी माजी उपनराध्यक्षा ,अविनाश ढोंगे, अविशांत अलगमवार,आदित्य तुमलवार ता महामंत्री युवा मोर्चा , विनोद कानमपाल्लीवर शहर अध्यक्ष युवा मोर्चा , नेरु मोरे ता अध्यक्ष ओ. बी. सी युवक आघाडी युवा मोर्चा , संजय जवादे,अमोल मोरे ता महामंत्री युवा मोर्चा ,नाना पोगुलवार शहर अध्यक्ष वि आघाडी , राजू ठाकरे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत