Click Here...👇👇👇

"कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा' प्रकाशन सोहळा. #Chandrapur #Nagaur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कवी देवेंद्र गुलाबराव मनगटे यांच्या 'कर्तृत्वशून्य स्वाभिमानी घोडा' या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ ला सायं. ५:०० वाजता कवी श्री. बबन सराडकर यांच्या हस्ते होणार आहे. सुप्रसिद्ध वक्ते प्रा. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाशी राणी चौक येथील विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील 'अमेय दालनात' हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे या कवितासंग्रहावर भाष्य करणार आहेत. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर मोते हे करणार आहेत. कवी देवेंद्र गुलाबराव मनगटे यांनी सर्व काव्य रसिकांना या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.