🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

कोरोनामुळे रद्द झालेली सिंगणेरी पॅसेंजर रेल्वे गाडी होणार सुरू. #Rajura

माजी आमदार ॲड. संजय धोटे यांच्या पाठपुराव्याचे फलित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना मुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे याचा नाहक त्रास येथील प्रवाशांना होत होता.शिरपूर, विरूर स्टेशन,माणिकगड रेल्वे स्टेशन,बल्लारपूर रेल्वे स्टेशन येथील येणाऱ्या संपूर्ण रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या,या सर्व समस्याची माहिती विरुर स्टेशन येथील नागरिक तसेच भाजपा पदाधिकारी यांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या लक्षात आणून दिली,या सर्व बाबीची माहिती माजी आमदार अँड.धोटे यांनी घेतली व तसेच दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक मा.गजानन माल्या यांची गडचांदूर रेल्वे स्टेशन येथे शिष्टमंडळाद्वारे सविस्तर भेट घेऊन सर्व माहिती अवगत करून निवेदन देण्यात आले होते,या संदर्भात मा.माल्या यांनी समस्या ऐकून घेतली व तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर रद्द झालेल्या पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते,
या मागणीला यश आले असून येत्या काही दिवसात सिंगणेरी पॅसेंजर गाडी सुरू होणार आहे,सिंगणेरी पॅसेंजर ही गाडी शिरपूर पर्यंत येत असून आता ही गाडी चंद्रपूर पर्यंत येणार आहे.
सिंगणेरी पॅसेंजर रेल्वे गाडी भद्रचलम ते चंद्रपूर गाडी नंबर 07260 व चंद्रपूर ते काजीपेठ गाडी नंबर 07271 ही पॅसेंजर गाडी सुरू होणार आहे,माजी आमदार अँड संजय धोटे यांनी सर्व रद्द झालेल्या गाड्या त्वरित सुरू करण्याकरिता पाठपुरावा केला होता, त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे असून राजुरा तालुक्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे,ही गाडी सुरू केल्याबद्दल माजी आमदार अँड संजय धोटे यांचे भाजपाचे जेष्ठ नेते सतीश कोमरवेल्लीवार, भाजपा शहर अध्यक्ष विरुर स्टेशन भीमराव पाला,भाजपा शहर सचिव शामराव कस्तुरवार,ग्रामपंचायत सदस्य मोतीराम दोबलवार, सोशल मिडिया संयोजक हितेश गाडगे, प्रदीप पाला यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत