Top News

वाघाच्या नवजात बछड्याच्या अवयवासह दोन आरोपीं ताब्यात. #Arrested

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- दिनांक 6 ऑक्टोबर 2021 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नागपूर चंद्रपूर पडोली उर्जानगर येथे धाड़ टाकून वाघाच्या नवजात बछड्याच्या अवयवासह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले यात लोमेश नानाजी डाबले रा. चिचबोड़ी तालुका सावली येथील जंगलातून वाघाचा नवजात शिशु वय अंदाजे 10 दिवस असून त्याच कृतीने मारून त्याचे पूर्ण शरीर जतन केले त्यानंतर त्याच विक्री करण्याच्या दृष्टीने संपर्क केला.

सदर घटनेची गुप्त माहिती वन विभागाला मिळतात त्यांनी सापळा रचून सतत दहा दिवस मागे लागून वनविभागाचे पथक कार्यरत होते दिनांक 6 ऑक्टोबर 2021 ला एम. आय. डी. सी. बुट्टीबोरी येथे विक्री व्यवहार करणार असल्याची माहिती प्राप्त झाली व त्यानुसार सापळा रचण्यात आला मात्र आरोपी नामे कालिदास रायपुरे यांनी मौजा पडोली जिल्हा चंद्रपूर येथे व्यवहार करणार असल्याचे सांगितले.

त्यानुसार अरुण गादेवार वनक्षेत्रपाल दक्षता पथक चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पथकात सामील करून वाघ बछडा मृत शरीरसह 2 आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. मागील वाघाचे अवयव तस्करी प्रकरणात काही धागेदोरे आहेत का याबाबतची तपासणी सुरू आहे.

या धाडीत डॉ. भारत सिंग हाडा, उपवनसंरक्षक नागपूर व अरविंद मुंडे, उपवनसंरक्षक, चंद्रपूर वन विभाग चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात एन.जी. चांदेकर, सहाय्यक वनसंरक्षक जंकास 2, एल. व्ही. ढोकळ, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, अरुण गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (दक्षता पथक) चंद्रपूर, टवले, शेंडे, जाधव, कुल्लरवार वनरक्षक यांनी धाड़ यशस्वी केली. पुढील तपास एन.जी. चांदेकर सहाय्यक वनसंरक्षक जंकास 2, उपविभाग उमरेड हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने