Top News

डॉक्टरविना रुग्णाचा गेला जीव. #Death


नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डॉक्टर तात्काळ निलंबित.

चिमूर:- दिनांक.१४/१०/२०२१ ला संजय गराटे रा.नेरी वय ३५ वर्षे हे सकाळी ०७:०० वाजताच्या सुमारास लगवीच्या जागेवर दुखत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी याठिकाणी उपचार घेण्यासाठी आले असता डॉक्टरांची आरोग्य केंद्रामध्ये उपस्थिती नसल्याने रुग्णास होणारा त्रास हा वाढत गेला आणि डॉक्टरविना व उपचार न झाल्याने रुग्ण आरोग्य केंद्रातच मरण पावला.याची नेरी येथील स्थानिकांना माहिती मिळताच जनतेनी आक्रोश व्यक्त करीत आरोग्य केंद्रावर धाव घेतली व तणावाची परिस्थिती निर्माण करून डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी केली.


या घटनेला ४ तासापेक्षा जास्त वेळ झाला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ.महेश मंगर , डॉ.निखिल कामडी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही असा विरोध दर्शविला. व पोलिसांनी स्वतःहून मृतकाचे शव उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेले.याची माहिती काँग्रेस नेते सतिष वारजूकर जि. प.सदस्य तथा गटनेते यांना मिळताच क्षणी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून रुग्णाच्या नातेवाईकांची मते जाणून घेतली व डॉक्टरांना सस्पेंड करून सस्पेंशन ची ऑर्डर जो पर्यंत देण्यात येणार नाही तोपर्यंत आरोग्य केंद्रातील ऑफिस सोडण्यात येणार नाही असेही यावेळी स्थानिकांसमोर मत मांडण्यात आले व या ठिय्या आंदोलनाला यश प्राप्त होत मागणी ऎकून जिल्ह्यावरून तात्काळ सस्पेंशन ऑर्डर आली.



व प्रकरण शांतचित्तेने कुठलाही गालबोट न लागता परिस्थिती आटोक्यात आणण्याचे कार्य पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती लताताई पिसे,तालुका अध्यक्ष संजय घुटके, जि. प.सदस्य मनोज ममिडवार,तालुका सचिव विजय डाबरे, चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगडे,विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील,तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर,सामाजिक कार्यकर्ते पप्पूभाई शेख, सरपंच रेखाताई पिसे ,ग्राम पंचायत सदस्य निखिल पिसे,तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने