Top News

सहा किलोमीटर पायपीट करत ताब्यात घेतला मृतदेह. #Death


चंद्रपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये पोलिसांनी तब्बल 6 किमी पायपीट करून एक मृतदेह ताब्यात घेतला. चंद्रपूर शहर पोलिसांना या घटनेची माहिती प्राप्त झाली आणि पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक सागर महाल्ले, पोलीस शिपाई रामदास चिटले, निलेश जीवतोडे, दिपक गुरुनुले यांची एक टीम लगेच घटनास्थळी पाठवली.
चंद्रपूर शहराजवळील नांदगाव पोडे परिसरात रेल्वे रुळावर हा मृतदेह पडला होता. पण इथपर्यंत जायचे कसे, हा प्रश्न होता. शेवटी पोलिसांनी आपले वाहन एका ठिकाणी उभे करून चिखल-काट्यागोट्याची वाट धरली. तब्बल तीन किलोमीटरचा रस्ता पायी तुडवत पोलीस त्या मृतदेहाजवळ पोचले. रेल्वेखाली आल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. दुर्गंधी सुटली होती. पण कर्तव्य महत्त्वाचे मानून पोलिसांनी हा मृतदेह उचलला. आणि पुन्हा तीन किलोमीटरचा खडतर मार्ग पार करीत मृतदेह वाहनात ठेवला. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.
शवविच्छेदन करून तो कुणाकडे द्यावा, हा प्रश्नच होता त्यामुळं नातेवाईकांची पोलिसांनी दोन दिवस वाट बघण्याच ठरवलं आहे. लवकरच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एका बेवारस मृतदेहाला शोधून, प्रसंगी हाल सहन करून पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने