जाहिरात... Advertisement... विज्ञापन

पोंभुर्णा तालुक्यातील मोहाळा रै. येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश. Pombhurna.


जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या नेतृत्वात समीर गौरकार सह अनेक युवकांनी बांधले शिवबंधन.
पोंभुर्णा:- शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे व युवासेना पक्ष प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांच्या मार्गदर्शनात व तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात मोहाळा रै.येथील समीर गौरकार याच्या सह भास्कर गौरकार ,स्वप्निल धानोरकर, वैभव गौरकार,लोमेश वाढरे, चेतन कष्टी, सचिन कारेकार,हर्षल गौरकार,पुरुषोत्तम गौरकार,अमर कारेकार,निखिल कष्टी,सुरज पोतराजे, राजू गौरकार, स्वप्निल गौरकार,रोशन उरकूडे ,सह अनेक युवकांनी शिवसेनेत जाहिर पक्ष प्रवेश केले.
जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्णा तालुक्यात शिवसेनेचा झंझावात जोरदारपणे सुरु असुन कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहिर प्रवेश करित आहेत.शिवसेना हा जनमानसातील तळागाळातल्या प्रत्येक घटकास सोबत राहात समाजकारण करणारा पक्ष असुन केवळ आणी केवळ शिवसेनाच समान्य माणसाला न्याय देऊ शकते.

यावेळी युवासेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार,शहर प्रमुख महेश श्रिगिरिवार,युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय व्याहाडकर,रविंद्र ठेंगणे,पराग मोरे,राकेश मोंगकार व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत