राज्यातील महाविद्यालये "या" दिवसांपासून सुरू होणार:- ना. उदय सामंत यांनी दिली माहिती. #College

Bhairav Diwase

मुंबई:- विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
विद्यार्थांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत, जिल्ह्यातील कोरोना स्थितीनुसार नियम असतील, असेही त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा, असेही उदय सामंत म्हणाले आहे.
राज्यमंत्रिमंडळात कॉलेज सुरु करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेमध्ये 20 ऑक्टोबरपासून कॉलेज सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती उदय सामंत यानी दिली आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीनुसार वर्ग भरवण्यात यावे अशीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.