Click Here...👇👇👇

जीवनोन्नती महिला प्रभागसंघामार्फत सामूहिक किराणा खरेदी व विक्री उपक्रमाचे उद्घाटन. Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण व शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी तालुक्यात कार्य करीत आहे. यासाठी गाव स्तरावर स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ व प्रभाग संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यांच्या माध्यमातून महिला सक्षम होवू पाहत आहेत. तसेच अभियानाने जी निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तिथून समूह, ग्राम संघ व प्रभाग संघ यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढवावेत यासाठी नियमित तसेच हंगाम नुसार विविध उपक्रम राबवून उत्पन्नात वाढ करायची आहे. त्यासाठी दसरा व दिवाळी सणाचे औचित्य साधून प्रभाग संघामार्फत सामूहिक किराणा खरेदी विक्री उपक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.

गट विकास अधिकारी यांनी महिलांनी उंच भरारी घेवून स्वावलंबी व्हावेत या बाबत मार्गदर्शन केलेत. तसेच सभापती मॅडम यांनी सुद्धा महिला सक्षम होवून स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. ही महिलांची शक्ती असून महिला आता पुरुषांच्या बरोबरीने व्यवसायात येत असल्याचे हीच उमेद अभियानाची फल निष्पती असल्याचे आवर्जून नमूद केले.
सदर कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. वाकुडकर, प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव व कोषाधक्ष्य उपस्थित होत्या. तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व कर्मचारी व कॅडर उपस्थित होते.