चंद्रपूर-गडचिरोली मुख्यमार्गावरील घटना.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील चंद्रपूर-गडचिरोली मुख्यमार्गावरील किसान नगर जवळ आज पहाटेच्या सुमारास Cg 08 z 0122 हा आर्यन गोळी ची वाहतूक करणारा ट्रक ने Mh 34 ap 1986 ला ड्रायवर साईड ला ठोस मारली त्यात एक चालक हा जागीच ठार झालेला असून तो त्यात अडकून पडलेला आहे.
सदर घटनेची माहिती सावली पोलीसांना होताच पोलीस घटनास्थळी जावुन महामार्ग खुला केले व त्याला काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. सावली पोलिसात कलम 279,304 अ,427 भादवी, सहकलम 184 मोवाका गुन्हा नोंद करण्यात आला. वृत्त लिहे पर्यन्त मृतक चालकाचे नाव माहिती झालेले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.