आजादी का अमृतमहोत्सव निमित्त देवाडा खुर्द येथे ग्राहक संरक्षण कायदा जनजागृती कार्यक्रम. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभूर्णा विधी सेवा समितीचे आयोजन.
पोंभूर्णा:- पोंभूर्णा तालूका विधी सेवा समितीच्या वतीने देवाडा खुर्द येथे आजादी का अमृतमहोत्सव निमित्ताने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई अंतर्गत न्याय सर्वासाठी या विधी सेवा घोषवाक्यान्वये ग्राहक संरक्षण कायदा मार्गदर्शन शिबीर पोंभूर्णा विधी सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले.
यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून पोंभूर्णा तालुका न्यायालयाचे न्यायाधिश एस.एस.दहातोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवाडा खुर्दचे सरपंच विलास मोगरकार, प्रमुख अतिथी म्हणून पोंभूर्णा तालूका बार ॲसोसिएशनचे अध्यक्ष ॲड.रणजीत खोब्रागडे, ग्रामपंचायत जामतुकूमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, सामाजिक कार्यकर्त्या हीना विश्वास यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यायाधीश दहातोंडे यांनी ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती दिली व नागरिकाचे न्याय विषयक समस्या जाणून आपसी निपटारा करण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्याय झालेल्या ग्राहकांच्या हितासाठी ग्राहक मंचात तज्ञ मध्यस्थिची नेमणूक केल्या जाते.तज्ञ मध्यस्तीच्या माध्यमातून न्यायनिवाडा करता येते असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोगरकार यांनी उपस्थित नागरीकांना ग्राहक संरक्षण कायदा हा प्रत्येक नागरिकांनी समजून घेतला पाहिजे कारण प्रत्त्येक व्यक्ती हा ग्राहक आहे.अनेक कंपन्या आपली फसगत करतात मात्र न्यायव्यवस्थेने ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळवून देत असतात. ग्राहकांच्या हितासाठी न्यायीक निवाडा होत असतो. आपसी तंटे समझोत्याने सोडविल्या जाते. मात्र याबाबत प्रत्येकांना कायद्याची जाणिव होणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूरदास गव्हारे यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपिक खनके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामविकास अधिकारी, न्यायालयाचे कर्मचारी, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमात बहूसंख्य नागरीक उपस्थित होते.