मजुरीला जाणाऱ्या महिलेवर शेतात नेऊन केला बलात्कार. #Rape


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चिमूर:- पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत शंकरपूर पोलीस चौकीच्या हद्दीतील शंकरपूर येथे राहणाऱ्या आरोपीने शेतात मजुरीला जात असलेल्या महिलेला बळजबरीने शेतात ओढत नेऊन बलात्कार केल्याची संतापजनक घटना 14 नोव्हेंबर रोजी शंकरपूर शेतशिवार परिसरात घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. अमोल बंडु नन्नावरे ( वय- 29 वर्षे ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दिनांक 14 नोव्हेंबर 21 रोजी दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान शंकरपूर येथील पीडित महिला ही रोज मजुकरीता शेतात कापूस वेचण्यासाठी पायदळ पांदन रस्त्यांने एकटीच जात असताना शंकरपूर येथील आरोपी अमोल बंडु नन्नावरे सदर पीडित महिलेला रस्त्यावर आडवा झाला, तिचे दोन्ही हात पकडून तिला बळजबरीने मारहाण करून, स्वतःच्या पऱ्हाटीच्या शेतात फरफटत घेवून गेला. पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर आरोपीने बलात्कार केला. पीडित महिलेच्या या तक्रारीवरून पोलीस ठाणे भिसी येथे आरोपी अमोल बंडु नन्नावरे रा. शंकरपूर याचे विरुद्ध कलम 376, 341, 323, 506 भा. द. वि. चा गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी त्याचे शेतातून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनात पो. उप. नि. सचिन जंगम हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत