Top News

देव पोहचविता-पोहचविता दोन जिवलग मित्र देवाघरी गेले #death #accident


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- भाचीच्या लग्न कार्यानिमित्त आयोजीत केलेला धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर परत येत असताना, चंद्रपूर एमआयडीसी परिसरात दुचाकी आणि बोलेरोमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर एमआयडीसी परिसरात काल बुधवारी ( ता. 22) सायंकाळी 6 वाजताच्या.सुमारास घडली. सुधाकर लक्ष्मण धोटे (वय 43) व मनोज गणपती जुनघरे ( वय 47) रा. विसापूर ता. बल्लारपूर असे मृतांची नावे आहेत.

📛विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे:- श्याम बोबडे
👇👇👇👇👇

अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही एकाच ठिकाणी नोकरीला होते. विसापूर येथील मनोज जुनघरे यांच्या भाचीचे 26 डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. त्यानिमित्त मनोज मित्र सुधाकर धोटे याच्यासोबत एम. एच. 34 बी. क्यू. 0413 या दुचाकीने वणी जि. यवतमाळ येथे भाचीच्या लग्न कार्यानिमित्त देव पोहचविण्यासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते घुग्घुस मार्गाने विसापूरकडे येत होते.
दरम्यान एमआयडीसी परिसरात मल्टी ऑर्गॅनिक कपंनी जवळील वळणावर बोलेरो वाहन क्रमांक एम. एच.34-एम. 2544 ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर धोटे जागीच ठार झाले. तर मनोज जुनघरे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दोघां मित्रांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने विसापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने