जिल्हा शल्यचिकित्सका तर्फे ग्रामीण रुग्णालयाची पाहणी व आढावा #Korpana

Bhairav Diwase
रुग्णांकडून जाणून घेतल्या समस्या अडचणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय गडचांदुर चे आहे. कोरपणा जिवती तालुक्यातील संपूर्ण रुग्ण हे गडचांदुर रुग्णालयात उपचारासाठी येतात रुग्ण कोणताही असो प्रथम त्याला गडचांदुर ग्रामीण रुग्णालय तच भरती करतात रुग्ण गंभीर असल्यास त्याला चंद्रपूर येथे हलवले जातात अशा च परस्थितीत रुग्णालयाची पाहणी रुग्णांशी, व अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेण्या साठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निवृत्ती राठोड यांनी 22 तारखेला रुग्णालयाला भेट दिली अनेक रुग्णांनी उपचारा बद्दल समाधान व्यक्त केले तर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या जेवण चहा नाष्टा वेळेवर देण्याचे आदेश संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला दिले रुग्णांना चिठ्या काढते वेळेस मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो त्या साठी रुग्णांना बाहेरून चीठया कशा देण्यात येईल या बाबत वैद्यकीय अधीक्षक यांना सूचना दिल्या आत मधे रुग्णांची गर्दी कशी कमी होईल यावर भर देण्यास सांगितले.

नवीन बनत असलेले ऑक्सिजन प्लॅन्ट व इमर्जन्सी इन्व्हेंटर प्लॅन्ट ची सुद्धा पाहणी करण्यात आली व योग्य मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णालयाच्या मागच्या बाजूला बनत सलेल्या नवीन इमारतीची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निवृती राठोड यांनी केली सोबतच नगर परिषद चे रुग्ण कल्याण चे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी आजूबाजूला असलेल्या कचरा व स्वच्छतेवर भर देण्यास अधिकारी शेडमाके, कर्मचारी संतोष करदोळे, याना सूचना देण्यात आल्या.
ग्रामीण रुग्णालयांचे नवनियुक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ गाटे व मावळते वैद्यकीय अधीक्षक डॉ गेडाम, डॉ जुबेर डॉ मनीषा किंनाके, आकाश राठोड, भूषण, रमेश राठोड शुधोधन धोंगडे ,लक्ष्मण राठोड, आशिष दानव, कमलेश गोटे सूरज चिमुरकर, शिल्पा साळवे व सर्व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते