💻

💻

राजकिय हस्तक्षेपाविरोधात अभाविपचे विद्यापीठासमोर निदर्शने #gadchiroli

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर स्वतःचे नियंत्रण आणण्यासाठी विद्यापीठ कायद्यात बदल करत काही निर्णय घेतले आहेत. या निर्णयानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती हे राज्यपाल असून देखील ते कुलगुरूंची थेट नियुक्ती करू शकणार नाहीत, राज्य सरकारच्या शिफारशीनुसार सुचवलेल्या नावांमधूनच कुलगुरूंची निवड राज्यपालांना करावी लागणार, प्र.कुलपती हे पद निर्माण करत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची प्र.कुलपती पदी नियुक्ती केली जाणार आहे.


📛विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे:- श्याम बोबडे
👇👇👇👇👇

मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आलेले हे सर्व निर्णय प्रस्तावित असून येत्या अधिवेशनात त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचा डाव राज्य शासनाने आखला आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून संबंधित निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ येथे अभाविप च्या वतीने तीव्र निदर्शन करण्यात आले. या आंदोलनात मुख्यमंत्री यांचा पुतळा ही जाळण्यात आला निदर्शना नंतर गोंडवाना विद्यापीठाच्या मा.कुलगुरूं मार्फत महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देखील देण्यात आले.यावेळी प्रदेश सहमंत्री अभिषेक देवर, जिल्हा संयोजक अंकुश कुणघाडकर, नगर मंत्री जयेश ठाकरे, सहमंत्री तुषार चुधरी,वडसा भाग संयोजक अक्षय कोकोडे ,श्रीनिवास उईके,हिरालाल नुरुटी,अनिल पोतरेट,विशाल हूर्रा,अविनाश मडावी,छबिल मडावी,श्रीकांत बागमारे ,हेमराज नुरुटी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत