Top News

जिवती तालुक्यातील अग्निशमन यंत्रणा बिनकामी.#जिवती

रुग्णसेवक जिवन तोगरे यांच्या आरोप.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील हिमायतनगर येथील शेतकरी दगडू कासार या शेतकऱ्याचे घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
अशा प्रकारे तालुक्यातील टेकामांडवा, शेडवाही, पाटण, आसापूर, पल्लेझरी, लेंडीगुडा, कुभेंझरी या ठिकाणी आगीच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या अशा घटणा पुन्हा घटू नव्हे म्हणून तालुका युवक काँग्रेसच्या माध्यमातून ३ नोव्हेंबर २०२१ रोजी आमदार सुभाष धोटे यांची भेट घेऊन जिवती तालुक्यातील सतत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना व त्यावर उपाय करण्यासंर्भात चर्चा आली तसेच परिसरात वारंवार आग लागून नुकसान होण्याच्या घटना घडत असल्यामुळे अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी आमदार सुभाष धोटे याच्याकडे केली होती, ही मागणी सुभाष धोटे यांनी पूर्ण केली आणि जिवती तालुक्यात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली मात्र काल जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथिल दगडु कासार यांच्या घराला आग लागुन आगीत पुर्ण पणे घर जळुन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना दि.२१/१२/२०२१ रोज मंगळवार ला रात्रीच्या सुमारास घडली असुन अचानक शाटसर्कीट मुळे हि आग लागली असल्याची माहिती आहे व घराला आग लागताच सामाजीक कार्यकर्ते ताजुदिन शेख यांनी आपल्या परीने पुर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन आग विजवण्याच प्रयत्न केले पण अग्निशमन यंत्रणा घर जळून खाक होई पर्यंत पोहोचली नाही यामुळे हि यंत्रणा बिनकामी ठरत आहे अशा आरोप प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवव तोगरे यांनी केला.#jiwati

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने