💻

💻

"ती" पट्टेदार वाघीण आयत्या बिळात घुसली अन् जेरबंद झाली.... Tiger tigerattack #TigerConfiscated

"त्या" पट्टेदार वाघीणीने साधली होती "हॉट्रीक"
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात वाघांची दहशत कायम आहे. रोजच वाघाचे कुठे ना कुठे दर्शन होत आहेत. आज दुपारी अकरा वाजताच्या सुमारास वाघाने एका बकरीला ठार केले याची माहिती गावकऱ्यांना होताच त्या वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी एकवटले आणी वाघाला पळवून लावले. वाघ पळुन जाताना पुलियात घुसला आणि त्यात अडकला. पुलियाचा पुढिल भाग बंद असल्याने तो तिथेच थांबला.

📛विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे:- श्याम बोबडे
👇👇👇👇👇

याची माहिती पोंभूर्णा वनविभागाला मिळताच त्यांची टिम घटनास्थळी दाखल झाली. आणि पाईप मधील जाणारा रस्ता बंद करण्यात आला. वाघ पुलीया मध्ये असल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणी वाघाला बघण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली. वाघाला सुटका करण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले पण वाघाला जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. यात गावकरी व वनविभाग यांची बाचाबाची झाली. पोलीसांनी प्रसंगावधान राखून गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाचाबाची झाल्याने थोडे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
----------------------------------------
वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्कु टिम घटनास्थळी दाखल झाली. वाघाला या पुलाच्या बाहेर काढण्यासाठी वनविभागाने वाघाला काढण्याचे शर्थीने प्रयत्न केले. तब्बल सात तासानंतर वाघाला पकडण्यात यश आले.
-------------------------------------
पोंभुर्णा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने अश्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
-------------------------------------
शेतकऱ्याचे शेतीचे फारमोठे नुकसान होत असून शेतकरी वाघाच्या भितीने शेतात न जात असल्यामुळे उभे पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत