जाहिरात... Advertisement... विज्ञापन

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर तर्फे पाठविले मुख्यमंत्र्यांना पत्र #chandrapur #latterचंद्रपूर:- राज्यातील महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक घाई घाईने पारित करून घेतले.
या काळया विधेयकाच्या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत.

याकरिता महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात तसेच सर्व भाजयुमो प्रदेश पदाधिकारी यांच्या सहकार्याने या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठवित आहेत त्याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण 22 मंडळातून ज्यामध्ये बल्लारपूर शहर, बल्लारपूर ग्रामीण,पोंभुर्णा तालुका, मूल शहर, मुल तालुका,चंद्रपूर तालुका, वरोरा शहर, वरोरा तालुका,भद्रावती शहर, भद्रावती तालुका, चिमूर तालुका, नागभीड तालुका, ब्रह्मपुरी शहर, ब्रह्मपुरी तालुका, सावली तालुका, सिंदेवाही तालुका, गोंडपिपरी तालुका, राजुरा शहर, राजुरा तालुका, कोरपणा तालुका,जिवती तालुका या संपूर्ण क्षेत्रातून जिल्ह्यातील युवा मोर्चाचे सर्व जिल्हा पदाधिकार्‍यांच्या व मंडळ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत