Top News

घनोटी तुकूम गावानजीक राॅबरी #chandrapur #pombhurna #Theft

१ लाख ९२ हजार ८६५ रूपयावर घातला दरोडा

उमरी पोतदार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

पोंभूर्णा देशी दारूच्या दुकानातील जमा रक्कमेवर दरोडा
पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरातील देशी दारूच्या भट्टीत जमा झालेली रक्कम आपल्या गावाकडे नेत असताना भट्टीच्या दिवाणजीला घनोटी तुकूम गावानजीक चोरट्यांनी अडवून दरोडा टाकला आहे. १ लाख ९२ हजार रूपयाची राबरी झाली असल्याच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोंभूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात अल्का बुक्कावार यांचे देशी दारूचे दुकान आहे. दुकान सांभाळण्याकरीता उमरी पोतदार येथील रहिवासी असलेले बंडू शंकरवार याला दिवाणजी म्हणून कामावर ठेवले आहे.
भट्टीत जमा झालेल्या रक्कमेचा हिसाब किताब शंकरवार याचेकडेच असल्याने. दि.८ जानेवारी रोज शनिवारला दारू भट्टीत जमा झालेली एकूण १लाख ४ हजार ९४० रुपये व शुक्रवारची जमा असलेली ७७ हजार ९२५ रुपये असे एकूण १ लक्ष ९२ हजार ८६५ रूपये घेऊन होंडा नावी या दुचाकीने आपल्या गावाकडे उमरी पोतदारला रात्री पाऊणे दहाच्या सुमारास पोंभूर्णा येथून जात असताना घनोटी तुकूम गावानजीक हनुमान मंदीराजवळील वळणावर रात्रो साडे दहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडूपात काळे दुप्पटे बांधून दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात इसमाने गाडीकडे बडगे व चाकू घेऊन धावून आले व गाडी अडवून मारहाण केली.
पैशाने भरलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतले.मोका पाहून शंकरवार घटनास्थळावरून गावाकडे ओरडत धावत सुटले. त्याचा आवाज ऐकून गावकरी गोळा झाली व घटनास्थळी धाव घेतले मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते.
सदर घटनेची माहिती उमरी पोतदार पोलिसांना देण्यात आली.लगेच उमरी पोतदारचे ठाणेदार निलकंठ कुकडे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच उप विभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी दाखल झाले. घटनेच्या तपासाकरीता डॉग स्काॅटला पाचारण करण्यात आले. तीन अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून.सदर घटनेचा तपास सुरू आहे. पोंभूर्णा शहरातील सर्व सिसिटीव्ही कॅमेऱ्यातील पुटेज तपासली जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने