Top News

माणिकगड सिमेंट कंपनीत कामगाराचा मृत्यू #death #gadchandur

आर्थिक मोबदल्यासाठी नातेवाईक मृतदेह ठेवले कंपनी गेट समोर
कोरपना:-  गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीत एका कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्याची घटना 26 जानेवरी रोजी सकाळी अंदाजे 8 च्या सुमारास घडली. घटनेची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसल्याने अनेक कामगार, सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे कार्यकर्ते, नेत्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली.
कामगाराच्या नातेवाईकांनी मोबदल्यासाठी शवविच्छेदनानंतर सदर व्यक्तीचे मृतदेह माणिकगड सिमेंट कंपनीच्या मुख्य गेट समोर आणुन ठेवले आहे. 3 तासांचा अवधी लोटले असून बातमी लिहिस्तोवर याप्रकरणी कोणताही तोडगा निघालेला नाही. गेटसमोर नातेवाईकांसोबत शहरातील नागरिकांची मोठ्यासंख्येने उपस्थिती आहे.उपविभागिय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त असल्याचे पहायला मिळत आहे. आता कामगाराला न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने