Click Here...👇👇👇

उमेद अंतर्गत राणी हिराई रुरल मार्ट व कॅन्टीन चे उद्घाटन #sindewahi

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, आझादीका अमृत महोत्सव च्या पर्वावर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सिंदेवाही, जिल्हा- चंद्रपूर अंतर्गत झेप महिला ग्रामसंघ रत्नापुर, भरारी ग्रामसंघ मोहाळी यांचे वतीने राणी हिराई रुरल मार्ट व कॅन्टीन चे उदघाटन थाटामाटात पार पडले. उमेद अंतर्गत तालुक्यातील हजारो गट जोडलेले असून RF,CIF व बँक कर्जाच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय सुरू करण्याकरिता मदत केली जात आहे.
महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्री करिता त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता प्रभाग संघाचे माध्यमातून पंचायत समिती परिसरात सदर विक्री केंद्र व उपहार गृह आज दिनांक 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या शुभ दिनी सुरू करण्यात आले. या माध्यमातून महिलांनी स्वतः गृहउद्योगाचे माध्यमातून मोहाचे, आंब्याचे, कवठाचे असे विविध प्रकारचे लोणचे, मोहाचे, आंबळीचे ज्युस, घरगुती तिखट, हळद, फिनाईल, पापड, दुग्ध जन्य पदार्थ, ताजा सेंद्रीय भाजीपाला वेगवेगळ्या बॅग, इत्यादी अनेक वस्तू येथे विक्री करिता उपलब्ध केलेल्या आहेत. या मार्ट ला जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आव्हान उमेद च्या वतीने करण्यात येत आहे.
सदर उद्घाटनाला मा. सौ. मंदाताई बाळबुद्धे सभापती, सौ. शीला कनाके उपसभापती, श्री. रमाकांत लोधे जि. प. सदस्य, श्री संजय पूरी गटविकास अधिकारी , श्री मधुकर मडावी, श्री रितेश अलमस्त, श्री रणधीर दुपारे, श्री राहुल पोरेड्डीवार ,सौ मीनाक्षी चौधरी, सौ प्रीती गुरनुले  पंचायत समिती सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडले . पदाधिकारी याना ग्रामगीता  व पुष्प गुच्छ देऊन मान्यवराचे स्वागत केले.
सदर  उपक्रमाचे यशस्वीते करिता श्री विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक, श्री उद्धव मडावी ता. व्य. श्री ज्ञानेश्वर मलेवार, श्री संदीप उईके, कु. सविता उईके प्रभाग समन्वयक श्री प्रफुल मडावी, श्री सचिन लोधे, श्री प्रभाकर मानकर, श्री हर्षद रामटेके, प्रभाग संघ अध्यक्ष व समूहातील सदस्य यांनी परिश्रम घेतले.