Top News

बार्टी तर्फे संविधान साक्षर अभियानाचा समारोप #sindewahi


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही

सिंदेवाही:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील नाचानभट्टी येथे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत संविधान साक्षर अभियान राबविण्यात आला संविधान साक्षर अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंधश्रद्धा निर्मूलन, संविधानिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, महिला सक्षमीकरण, तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .


          कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मनिष गणवीर यांच्या मार्गदर्शना खाली  सिंदेवाही तालुका समतादूत कृपाली धारणे यांनी केले या संपूर्ण अभियानात गावचे सरपंच विद्याताई खोबरागडे सदस्य व कर्मचारी तसेच मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा सुरेश राऊत सर व इतर शिक्षक यांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे स्वयंसहायता युवा गटातील सर्व युवकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला व अभियान मोठ्या उत्साहात पार पडला ,  26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या अभियानाचा समारोप ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा नाचन भट्टी यांना संविधान प्रस्तावना फ्रेम देऊन करण्यात आली याप्रसंगी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने