जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यामुळे मिळाला रुग्णाला प्राणवायूचा "आधार" #adhar

कोरपना:- तालुक्यातील नारंडा येथील रुग्ण श्रीमती कुसुमबाई बोबडे यांना प्राणवायूची कमतरता जाणवत होती. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीनुसार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नारंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नारंडा येथील श्रीमती कुसुमबाई बोबडे यांच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात संपर्क साधून ऑक्सिजन मशीन घेऊन रुग्णांला प्राणवायूचा पुरवठा सुरु केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राणवायूची कमी जाणवत असताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक रुग्णांना यांचा फायदा झाला. त्याच अनुषंगाने कोरपना तालुक्यातील नारंडा येथील रुग्णाला सुद्धा या ऑक्सिजन मशिनचा फायदा होत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत