नुकसान भरपाई देण्याची नातेवाईकांची मागणी
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर माणिकगड सिमेंट कंपनीत एका कामगाराचा कामावर असतांना चक्कर येऊन मृत्यू झाला याची माहिती वाऱ्या सारखी शहरात पसरली असून अनेक कामगार, सामाजिक संघटना व इतर पक्षातील पदाधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली. कामगाराच्या नातेवाईकाला नुकसान भरपाई जो पर्यंत देण्यात येणार नाही, तो पर्यंत पोस्टमार्टम करू देणार नाही. असा सबळ इशारा कंपनीला व ठेकेदाराला देण्यात आला.
मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव प्रकाश पवार असून तो अनेक वर्षांपासून कंपनीत ठेकेदार पद्धतीत कामावर होता. कंपनीचे अधिकारी ठेकेदार मृत्यकाच्या नातेवाईकांशी विविध पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संघटना च्या वतीने नुकसान भरपाई बाबत मध्यस्ती सुरू आहे. बातमी लिहेपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.