Top News

वर्ध्यात कारचा भीषण अपघात #accident

७ विद्यार्थ्यांचा मृत्यू, भाजपच्या मुलांचही समावेश
वर्धा:- वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीतील सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.
वर्ध्यामधील सेलसुरामधे झायलो कारचा भीषण अपघात झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघातात दत्ता मेघे वैद्यकीय रूग्णालयातील सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार विजय राहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा अविष्कार राहांगडालेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
पहाटे दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्यानं वर्ध्याकडे सलोडला येताना सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सातही मुलांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयामध्ये रात्रीस आणण्यात आले आहेत. सातही विद्यार्थी दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने