ट्रक अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू#Accident

Bhairav Diwase
ओव्हरलोड वाहतुकीची समस्या; मुदतबाह्य वाहनांची वाहतूक.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- गडचांदूर-राजुरा राज्य महामार्गावर रामपूर नजीक रेल्वे पुलियाजवळ आज सायंकाळी ८ वाजता (दि. २५) आर्वी कडे जात असलेल्या मोटरसाईकलला धडक देत दोन मोटरसाईकलस्वार जागीच ठार झाले आहे. यामुळे घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आर्वी येथील राकेश दौलत तोडासे (वय २५) व हनुमान बापूजी तोडासे (वय ३०) हे कामानिमित्य राजुरा येथे आले होते. काम करून घरी जात असताना आर्वी कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने रामपूर जवळील रेल्वे पुलियाजवळ धडक दिल्याने मोटरसाईकल स्वार जागीच ठार झाले. दोघेही सख्खे चुलत भाऊ आहे. या घटनेमुळे आर्वी गावात शोककळा पसरली आहे.
रामपूर-पोवणी-साखरवाही राजुरा-आर्वी या मार्गावर रात्रंदिवस वेकोलीची कोळसा वाहतूक सुरू राहते, कोळसा वाहतुकीमुळे पहिलेच रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. वाहनधारकांना वाहन कोणत्या बाजूने टाकावे असा प्रश्न पडत असतो, मात्र बांधकाम विभाग व वेकोली प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने नेहमी अपघाताची मालिका सुरू असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.#Accident