Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

पोंभुर्णा नगर पंचायतीचा कारभार सुरळीत:- नगराध्यक्ष सुलभा पिपरे #pombhurna

पोंभुर्णा:- दाखला, वारसांपत्र व इतर कागदपत्रांची वेळेच्या आत पुर्तता करण्यात येत असल्याचा दावा करीत पोंभुर्णा नगर पंचायतीचा कारभार सुरळीत असल्याचे नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांनी स्पष्ट केले आहे.
अभूतपूर्व विकासाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत पोंभुर्णाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अतिशय घवघवीत असे यश नागरिकांच्या आशिर्वादाने आणि २५२ कोटी रुपयांच्या पोंभुर्णा नगर पंचायतीमधील विकास कामाने मिळाला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे हे यश विरोधकांना बघवत नाही आहे. त्यामुळे आकसाने आणि निराशेपोटी विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याचे भाजपने म्हटले आहे.
विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभुर्णा नगर पंचायतीचा हेवा वाटावा असा विकास झालेला आहे. त्यामुळे सलग दुस-यांदा नगर पंचायतीवर विजय मिळाला. ज्या दिवशी अधिकृतपणे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांची निवड झाली. त्या दिवसापासून नगर पंचायतीमधील लोकोपयोगी कामाची सुरुवात सर्वच पदाधिका-यांकडून सुरु झाली आहे. नागरिकांना वेळेत दाखला, वारसांपत्र व इतर कागदपत्रांची वेळेच्या आत पुर्तता करण्यात येत आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वच पदाधिकारी घेत आहे.
विकासमाकामाच्या श्रृंखलेखित अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या धरतीवरती पोंभुर्णा नगर पंचायतीची इमारत दिमाखात उभी आहे. असे असंख्य विकासकामे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतुन करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे येत्या काळात पोंभुर्णा नगर पंचायती अंतर्गत जी थोडी थोडकी कामे शिल्लक आहेत, ती सुध्दा येत्या काळात मार्गी लागुन पोंभुर्णा शहराच्या विकासात व सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे हेच खरे विरोधकांचे दुखणे असल्याने पदभाराचे कारण धरुन टिका करण्यात आलेली असल्याचे नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत