Top News

सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले #Mumbai

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधान सभेत घणाघात
मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. दिलेला हा शब्द पाळण्यात सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा घणाघात महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधान सभेत केला. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.
अन्न देणाऱ्या शेतकऱ्याचा महाविकास आघाडी सरकारला विसर पडलाय. कर्जमाफीचा मुहूर्त शेतकऱ्यांना सापडत नाही. महाराष्ट्रापुढे व महाराष्ट्र सरकारपुढे सद्य:स्थिती शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय दुसरा महत्त्वाचा प्रश्न असू शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटामुळे ते व्हिडीओ काढत आत्महत्या करीत आहेत. तरीही सरकारला या मुद्द्याचे गांभीर्य वाटत नाही. विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता तर पश्चिम महाराष्ट्रातही आत्महत्या सुरू झाल्या आहेत. तरीही सरकार गप्प असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने