जाहिरात... Advertisement... विज्ञापन

सत्ता असो कि नसो, विकास हेच आमचे ध्येय:- आ. मुनगंटीवार #Chandrapur

चंद्रपूर:- शेवटच्या माणसाची, शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करणे हा आमचा संकल्प आहे. सत्ता असो की नसो, विकास हेच आमचे ध्येय आहे. नागरिकांची साथ असली की, विकासकार्याला गती मिळते, असे प्रतिपादन भाजपा आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शहरातील स्थानिक बाबुपेठ प्रभागातील जनतेला दिलेल्या वचनाची पुर्तता करण्यासाठी मुनगंटीवार यांनी 16 कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध करून दिला. मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द पाळल्याने परिसरातील भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक बाबूपेठ येथे जल्लोष करीत मुनगंटीवार यांचे कौतुक केले आहे. या निधीतून आता बाबूपेठ प्रभागातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले रस्ते व नालींचे काम पूर्ण केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत