www.adharnewsnetwork.com
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी
रविवार, मे १४, २०२३
Google ads.
आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला, तरी काहीतरी राहतंय, अशीच जाणीव करून देणारा आहे. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, तरी आईची महती लिहून पूर्ण केली जाऊ शकत नाही. आई मुलांवर संस्कार करते, शिकवते, स्वावलंबनाचे धडे देते; प्रसंगी मुलांसाठी वाटेल ते करायला ती तयार असते. 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य अगदीच खरे आहे
आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई… आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम व्यक्त करा.
आई हे दोन अक्षरी शब्द आपल्या चेहऱ्यावर आनंद, आपल्या जीवनात उत्साह, सुख निर्माण करत. आई साठी आपण कधीच काही विशेष करत नाही. पण आई आपल्यासाठी नेहमी काहीना काही विशेष करतच असते. जसे की, नवीन कपडे घेऊन देणे, नवनवीन पदार्थ बनवणे, आपले हट्ट पूर्ण करून देणे. सर्व काही आई लगेच पूर्ण करते
आई माझा गुरु, आई कल्पतरू, सुखाचा सागर आई, प्रीतीची माहेर आई आशा एक न अनेक शब्दांनी आईचा महिमा गाईला जातो. आपल्या संस्कृतीत आई वडिलांनाच देव व आई वडीलांनाच संपूर्ण सृष्टि चा दर्जा दिला आहे. आई ही आपल्या बाळासाठी कोणतेही दिव्य करू शकते. आईच्या चरणांमध्ये स्वर्ग सुख आहे आणि म्हणूनच सृष्टि रचयिता स्वयंम परमेश्वर देखील अनेकदा पृथ्वीवर जन्म घेऊन आईचे प्रेम उपभोगतो
जी व्यक्ती आपल्याला सगळ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते ती म्हणजे आपली आई, आपल्याला काहीही हवं असेल तर तिला कधी सांगावं लागत नाही, ज्याला आई नाही आहे त्याला विचारा की आईच महत्व काय आहे, आई म्हणजे आपल्या जीवनातील अशी व्यक्ती जिच्या प्रेमात कधीच बदल होत नाही
खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय त्याच्या आईकडेच जाते. सुसंस्काराचे घडविणारी मार्गदर्शन करणारी, प्रेम करणारी, माया करणारी, तत्वज्ञान सांगणारी, खडसावणारी, चुका शोधून योग्य दिशा देणारी, मदत करणारी, लक्ष ठेवणारी, काळजी करणारी, जपणारी ती आई अशा कित्येक भूमिका आई पार पाडते. आईची जागा तिच्याशिवाय कोणीच घेवू शकत नाही.
आई म्हणजे मायेची ऊब, ममता,जिव्हाळा, जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो, रविवार १४ मे २०२३ रोजी मदर्स डे साजरा केला जात आहे.
Tags