अल्पवयीन मुलगी व २१ वर्षीय युवकाचे प्रेमसंबंध #chandrapur #warora

Bhairav Diwase

अल्पवयीन मुलगी गर्भवती, युवक फरार

Google ads.
वरोरा:- वरोरा शहरातील एक अल्पवयीन मुलगी पोट दुखते म्हणून घरच्यांना सांगितल्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांच्या तपासणीतून तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले.

शुक्रवारी रूग्णालयातून वैद्कीय अहवाल वरोरा पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीला गर्भधारणा करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी युवक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

वरोरा पोलिस ठाणे अंतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलगी व २१ वर्षीय युवकाचे प्रेमसंबंध जुळले. दोघेही वरोरा शहरातील विद्यालय व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

प्रेमसंबंधातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांनी अल्पवयीन मुलगी पोट दुखते म्हणून घरच्यांना सांगू लागली. दरम्यान, तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगतात घरच्यांच्या पायाखालची वाळू घसरली. शासकीय रुग्णालयातून अहवाल ठाण्याला प्राप्त होताच त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.