उड्डाणपूल संदर्भात अधिकाऱ्यांची "आॕन द स्पॉट" पाहणी #chandrapur #Korpana #Gadchandur

Bhairav Diwase
0
अधिकाऱ्यांकडून सकारात्मक चर्चा


Google ads.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा ते गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग 353 चे काम सूरू आहे.या महामार्गावर विराजमान औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या,मोठी बाजारपेठ व 45 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहर येथे स्थानिक "समाधान पुर्ती बाजार ते वीर बाबुराव शेडमाके" चौकापर्यंत पॅक स्वरूपाच्या उड्डाणपूलाची निर्मिती होणार होती.जर याठिकाणी पॅक स्वरूपाचे उड्डाणपूल झाले असते तर शहर 2 भागात विभागले गेले असते,नागरिकांच्या आवागमनासाठी एकच ठिकाणी बोगदा तयार करण्यात येणार होता.यामुळे हजारो शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, नागरिकांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागणार होता.मुख्य म्हणजे येथील व्यापार ठप्प झाले असते. यासर्व बाबींचा विचार करून शहरवासीयांनी या उड्डाणपूलाला विरोध दर्शविला आणि 5 मे रोजी गडचांदूर येथील संविधान चौकात रस्ता रोको आंदोलन करून याकडे शासनाचे लक्ष वेधले.अशीच परिस्थिती कोरपना येथेही उद्भवणार होती.उड्डणपूल बंद बनवण्याऐवजी आतून खुला व पिल्लर स्वरूपाचा बनवण्यात यावा तसेच वाहतूकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे फाटका वरून उड्डाणपूल बनवण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती.


    यासाठी राज्याचे वने,सांस्कृतीक कार्यक्रम,मत्सय व्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 7 मे रोजी नागपूर येथे भेट घेऊन निवेदन दिले व आपली व्यथा मांडली.गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले.दरम्यान ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथेच बैठक आयोजित करून सदर समस्या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी,गडचांदूर व कोरपना येथील सर्वपक्षीयनेते,व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.यामध्ये ना.सुधीर मुनगंटीवार यांनी मोका पाहणी करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले.


याच पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या ताफ्यासह 12 मे रोजी दुपारी रखरखत्या उन्हात गडचांदूर व कोरपना येथे येऊन "स्पॉट पाहणी" केली.नंतर गडचांदूर येथील चांदणी चौक येथे समस्त व्यापारी व सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून पॅक ऐवजी खुला पिल्लर स्वरूपाचा व रेल्वे फाटकावरून उड्डाणपूल बनवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. नकाशा व इतर कागदपत्रांची पूर्तता करून सदर प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली असून यामुळे कोरपना व गडचांदूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेच्या भावनांचा आदर करत सकारात्मकता दाखवल्याने बद्दल तसेच ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मोठ्याप्रमाणात पुढाकार घेल्याबद्दल आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी योग्य ती मदत तसेच नेतृत्त्व केल्याबद्दल गडचांदूर व कोरपना येथील नागरिकांनी अगदी मनाच्या अंतकरणातून यांचे आभार मानले आहे.जनतेच्या सेवेसाठी भाजपा सदैव तत्पर असल्याचे मत यावेळी देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.नागरिकांच्या मागणीची वाटचाल यशप्राप्तीकडे होत असल्याने आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)