Top News

रेल्वेच्या धडकेत अस्वल ठार? #Chandrapur #rajura

माहिती देण्यास वनविभागाची चुप्पी?
संग्रहित छायाचित्र

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- राजुरा वनपरिक्षेत्र च्या विहिरगाव उपक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मूर्ती बिट कक्ष क्रमांक 200 मधून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गात रेल्वेच्या धडकेत एक अस्वल ठार झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली परंतु सदर घटनेची माहिती देण्यास वन अधिकाऱयांनी विलंब करण्याचे कारण मात्र समजले नाही?
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसाहायक नरेंद्र देशकर, वनरक्षक सायस हाके, संजय सुरवसे आणि वनमजुर घटनास्थळी पोहचून पंचनामा केला त्यानंतर राजुरा येथील काष्ठ आगारात आणून शवविच्छेदन करून जाळणत आले.
आजपर्यंत चुनाला ते विरुर दरम्यान या मध्य रेल्वे मार्गात रेल्वेच्या धडकेत अस्वल, चितळ असे अनेक वन्यप्राण्यांचा नाहक बळी जात आहे हे अतिशय गंभीर बाब असून वनविभाग या वन्यप्राणी सुरक्षिततेबाबत गंभीर नसल्याचा आरोप वन्यजीव प्रेमींनी केला आहे आतातरी वनविभागानी वन्यजीव सुरक्षित राहतील याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने