आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करून विकासाच्या संधी प्राप्त करा:- खासदार बाळू धानोरकर #chandrapur

Bhairav Diwase
सोमय्या पॉलिटेक्निक येथील सांस्कृतिक महोत्सव
चंद्रपूर : योग्य वेळी योग्य करिअर निवडल्यास त्याचा आयुष्यभर फायदा होतो. आवडीच्या क्षेत्रात करिअर केल्यास विकासाच्या संधी प्राप्त करता येतात. त्यामुळे सर्वांनी आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करून विकासाच्या संधी प्राप्त करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते चंद्रपूर येथील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रियदर्शनी सभागृहात आयोजित सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे, महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर, महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळ संस्थेचा सचिव अंकिता आंबटकर, प्राचार्य एम. झेड शेख यांची विशेष उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो. ज्या क्षेत्राची आवड आहे. अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी, केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर त्या क्षेत्रात अविरत निष्ठेने काम केल्यास यश मिळते. स्पर्धा परीक्षेतील स्वरदा शिगेला पोहचली आहे. स्पर्धा परीक्षा देताना नियोजन करून अभ्यास करायला हवा. अधिकारी बनल्यानंतर देशसेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थिती विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.