💻

💻

महाराष्ट्र राज्यातील मविआ (MVA) सरकार कोसळलं #Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा
महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली आणि आता पर्यायाने सरकार पडणार, हे स्पष्ट झालंय.
यादरम्यान महाविकास आघाडीतही बैठकींचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक बोलावली असून सर्व मंत्री उपस्थित होते. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी मंत्रीमंडळाची ही शेवटची कॅबिनेट ठरली. आजच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधन करत मोठा निर्णय घेतला. मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील मविआ (MVA) सरकार कोसळलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत