Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

महानगरातील ५९१ नागरीक सुरक्षित स्थळी #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन टीमद्वारे पुरग्रस्त भागातील ५९१ नागरीकांना सुरक्षीत स्थळी आणण्यात आले आहे. रहमत नगर, सिस्टर कॉलोनी,राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, ठक्कर कॉलोनी येथे रेस्क्यु ऑपरेशन राबवुन नागरीकांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.
मनपाच्या महाकाली कन्या शाळा येथे ११४, माना प्राथमिक शाळा येथे ८०, शहिद भगतसिंग शाळा येथे ३५, महात्मा फुले शाळा येथे २१६, किदवई शाळा येथे ८५ जेष्ठ नागरिक संघ येथे ४६ तर अग्रसेन भवन येथे १५ नागरीकांना ठेवण्यात आले असुन त्यांची व्यवस्था व देखभाल करण्यात येत आहे.
महानगरपालिकेद्वारा आपत्ती व्यवस्थापन टीम सतत कार्यरत असुन अनेक रहिवासी भागात पाणी शिरल्याने नागरीकांना बाहेर काढण्याची मोहीम रात्रीपासून सुरु आहे.
#चंद्रपूर #chandrapur #आपत्तीव्यवस्थापन #flood #DisasterManagement #ChandrapurCityMunicipalCorporation #safetyfirst
#DisasterResponse #emergencyresponse #Monsoon #Thunderstorms #weather #Thundering #lightning

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत