माजी नगरसेवक विशाल निंबाळकर पूरग्रस्त भागातील नागरिकांचे बनले "आधार" #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे सात दारे उघडण्यात आले आहे. 
तरी नदीकाठी असलेल्या भागांमध्ये जागोजागी पाणी साचल्याने माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी विठ्ठल मंदिर वार्ड, विठोबा खिडकी परिसराची पाहणी केली. व त्या पुरग्रस्त भागातील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी मदत केली.
या भागातील नागरिकांना मदत लागली तर माजी नगरसेवक विशाल निंबाळकर यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या