Click Here...👇👇👇

सामाजिक कार्यकर्ते केतन जुनघरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर #chandrapur #Rajura

Bhairav Diwase

राजुरा:- राजुरा येथील सामजिक कार्यकर्ते केतन जुनघरे यांच्या वाढदवसानिमित्त राजुरा शहरातील साई नगरातील हनुमान मंदिरात मित्रमंडळा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात भर पावसात देखील अनेक राक्तदात्यांनी रक्तदान केले. गेल्या अनेक वर्षांपासून केतन हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
शिबीराचे उदघाटन जेष्ठ नागरिक श्री आनंदराव ताजने, शालीकराव उरकुडे, प्रकाश रासेकर यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संतोष देरकर , राजकुमार डाखरे, रखीब शेख, उत्पल भाऊ गोरे , उपस्थित होते संपूर्ण मित्र परिवारासोबत चंद्रपूर येथील भूमिपुत्र बहुदेशिय संस्थेचे सदस्य , तसेच रक्त संक्रमण केंद्र ची सम्पूर्ण चमू उपस्थित होती.
कमी वयातच उत्कृष्ट सामाजिक कार्या बद्दल आज समाजातून केतन वर कौतुकाची थाप पडताना दिसत आहे. समाजा प्रति आपण नेहमी कटी बद्ध असून रक्तदान सारखे श्रेष्ठ दान दुसरे नाही म्हणून जन्मदिनाच्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे प्रतिपादन केतन ने या वेळी केले. सलग गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रच्या यशस्वीतेसाठ सुजित भाऊ कावळे, अतुल ताजने , चेतन उरकुडे, राहुल्या रासेकर, हर्षल भोयर तथा आदी मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले.