Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

राष्ट्रवादी आणि तुळशी नगरच्या नागरिकांसाठी सुभाष भाऊ आले धावून #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे सात दारे उघडण्यात आले आहे. तरी नदीकाठी असलेल्या भागांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे.
राष्ट्रवादी नगर आणि तुळशी नगर जो भाग पाण्याने वेढलेला असल्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी महानगर पालिका चंद्रपूर चे आयुक्त मोहिते यांना संपर्क साधून त्यांनी त्वरित मदत कार्य करावी अशी विनंती केली. लगेच तुंभेकर साहेब सब फायर ब्रिगेड ऑफिसर यांनी आपल्या टीम सोबत येऊन कंर्चलावर परिवाराला व बाकी दोन परिवाराला सुखरूप बाहेर काढले. त्यामध्ये एक महिन्याच्या बाळ पण सुखरूप काढल्याची माहीती सुभाष कासनगोट्टूवार यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत