युवा मोर्चाच्या वतीने पूरग्रस्त भागाचा दौरा #chandrapur

Bhairav Diwase
जिथे कुठेही मदतीची गरज असल्यास संपर्क करा आम्ही मदतीला धावून येऊ:- आशिष देवतळे
चंद्रपूर:- गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे लक्षात येताच महाराष्ट्राचे लोकनेते लोकलेखा समिती अध्यक्ष मान.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात युवा मोर्चाच्या माध्यमातून नदीच्या लगत असलेले बल्लारपूर शहरातील गणपती वार्ड आणि किल्ला वार्ड परिसरातील नागरिकांच्या घरांची पाहणी करण्यात आली.

यापूर्वी 2006 आणि 2012 मध्ये सुद्धा नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि यावर्षी सुद्धा सततच्या पावसामुळे व धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि वार्डातील नागरीकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान होत आहे ही माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवताळे यांनी आ.सुधीर भाऊंना फोनच्या माध्यमातून दिली तेव्हा सुधीर भाऊंनी जिल्ह्यात जिथे कुठेही पुरामुळे नागरिकांचे नुकसान झाले असेल तिथे तातडीने पोहोचा व मदतीचा हात द्या असे निर्देश दिले यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या नेतृत्वात शहरातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा महामंत्री मिथिलेश पांडे, जिल्हा उपाध्यक्ष मोहित डंगोरे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली व नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले तसेच जिथे कुठेही मदतीची गरज असल्यास संपर्क करा आम्ही मदतीला धावून येऊ असे आव्हान जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी नागरिकांना केले.