विज कोसळून महिलेचा मृत्यू #death #chimur #chandrapur

Bhairav Diwase
चिमूर:- तालुक्यातील मासळ (बुज) येथे महिला शेतकरीच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. सौ. प्रियंका किशोर मोडक (३५) रा. मासळ (बुज) असे मृतक महिलेचे नाव आहे.
 प्राप्त माहितीनुसार प्रियंका मोडक ह्या आपल्या शेतातून काम करून घरी परत येत असतांना अंगावर वीज कोसळली यात त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेने मोडक कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळले असून गावात शोककळा पसरली आहे.