पट्टेदार वाघाने घेतला गोठ्याचा आसरा #Tiger

Bhairav Diwase
0


वरोरा:- वरोरा तालुक्यातील चारगाव बु. येथे मोठ्या पट्टेदार वाघाने सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे गोठ्यात आसरा घेतला आहे.

वरोरा-चिमूर महामार्गावरील चारगाव बुद्रुक येथील शेतकरी संजय लाखे यांच्या गोठ्यात एका मोठ्या पट्टेदार वाघाने दुपारपासून ठाण मांडले असून नागरिक पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत गर्दी लागली असून मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यासाठी ओढ लागली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)