४० फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्यावर आनंद लुटताना पर्यटक
चिमूर:- चिमूर तालुकात निसर्गाने नटलेल्या व हिरव्या वनराईने आच्छादलेला मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. हे सौंदर्य पाहूनच पर्यटकांच्या मुखातून आपसूकच काय तो डोंगर.... काय ती झाडी.... काय तो धबधबा असे सहज उद्गार बाहेर पडत आहेत.
चिमूर तालुक्यात माना समाजाचे श्रद्धास्थान असलेले मुक्ताई मंदिर आहे. हे मंदिर वाघाई पहाडावर स्थित आहे. डोमा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ हिरव्या वनराईने नटलेले आहे. याच मंदिराजवळ असलेली पहाड़ी व ४० फुटांवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यातच पक्ष्यांचा किलबिलाट, माकडांचा 'हुपहूप' आवाज यामुळे हे आकर्षण आणखी वाढत आहे. प्रत्येक पावसाळ्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. जसा जसा मुसळधार पाऊस पडतो, तसा या धबधब्याचे सौंदर्य आणखी बहरते